Confident English Speaking

These are very helpful article on mastering

the art & science of Spoken English.

Improve Your Vocabulary For English Speaking


आज आपण डिस्कस करणार आहोत, मराठीतली एक फार प्रसिद्ध म्हण आहे जी मी आपल्या कोर्समध्ये वारंवार तिचा वापर केला आहे. ती म्हण आहे - आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

गावांकडे विहिरीला आड असं म्हटलं जातं. गावांमध्ये विहिरीला आड असे म्हंटले जाते आणि पोहरा म्हणजे बादली. त्याचा अर्थ असा कि जर विहिरीतच पाणी नसेल तर तुम्ही कितीही बादली वर खाली केली तरी पाणी येणार नाही.

इंग्लिश स्पिकिंग करताना जर तुमचा शब्दसाठा कमी असेल. शब्दांच्या बाबतीत जर नॉलेज तुमचं जर कमी असेल तर तुम्ही कितीही विचार केला, कितीही प्रॅक्टिस केली, कितीही तशा सिच्युएशन मध्ये गेलात तरी तुम्हाला, ते शब्द योग्य वेळी आठवणार नाहीत.

कारण तुमचा शब्दसाठा कमी असल्यामुळे, तुम्हाला खरोखर चांगल इंग्लिश बोलायचं असेल तर तुमचा शब्दसंग्रह वाढवायला सुरुवात करा. तुमची वोकॅबुलरी वाढवायला सुरुवात करा. रोज एक नवीन शब्द शिकायला सुरुवात करा.

काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की सहा महिन्यात जवळपास 150 200 नवीन शब्द तुमच्या शब्दसंग्रहामध्ये ऍड झालेले आहेत. लगेच तुम्हाला फरक समजणार नाही पण मी डाऊन द लाइन तीन महिने - सहा महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही काही सिचुएशनमध्ये फार इसिली बोलतात त्याचं कारण असं की त्या सिच्युएशनमध्ये जे शब्द यायला हवेत याचा पुरेपूर साठा तुमच्याकडे आहे.

तुमची शब्दांची विहीर आहे ती शब्दांनी पुरेपूर भरलेली आहे. तुम्हाला खूप खोल जाऊन पाणी नाही काढावा लागत आहे. जस्ट हाती घेतला की भरपूर शब्द समानार्थी शब्द तुम्हाला तिथे येतात.

जेवढे जास्त तुम्हाला शब्द माहिती असतील तेवढे कोन्फिडेन्टली तुम्ही इंग्लिश स्पिकिंग करू शकाल.

सोआय होप एक शब्द- एक दिवसाला हा रूल तुम्ही आता फॉलो करा आणि रोज एक तरी नवीन शब्द शिका.

बघा, लवकरच कोन्फिडेन्टली इंग्लिश मध्ये तुम्हाला बोलताना या गोष्टीचा डेफिनेटली फायदा होईल.