Frequently Asked Questions
उत्तर – नक्कीच. २००२ पासून शेकडो जणांनी या कोर्समध्ये दिलेल्या कॉन्सेप्ट्सचा वापर करून इंग्लिश बोलायला सुरुवात केली आहे. तुम्हीही नक्कीच इंग्लिश बोलू शकाल !
उत्तर – 365 दिवसांची मनी-बॅक गॅरंटी ! मी तुम्हाला 50 - 100 दिवसाची नाही, तर 365 दिवसाची १००% 'मनी बॅक' गँरंटी देतो आहे. जर तुम्हाला वाटलं कि आपल्याला ह्रा कोर्सचा फायदा नाही झाला, तर तुम्ही फक्त मला सांगा - फोन किंवा ई-मेलने. मी तुमचे सर्व पैसे परत करेन, अर्थात - मला पूर्ण खात्री असल्यामुळेच मी ही एवढी बोल्ड गॅरंटी देतोय, म्हणून तुम्ही ह्रा कोर्समध्ये सांगितल्या प्रमाणे गोष्टी करा व इंग्लिश बोलायला सुरुवात करा.
उत्तर – हे फक्त पुस्तक नाही, तर संपूर्ण कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये व्हिडिओ, ऑडिओ, ईबुक्स, एक्सरसाईसेस दिलेल्या आहेत. या सर्वांचा वापर करून तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायला शिकणार आहात.
उत्तर – शब्द पाठ करण्यापेक्षा माझा भर नेहमी शब्द आत्मसात करण्यावर असतो. ते आपल्याला वेळेवर आठवले पाहिजेत व समजले पाहिजेत, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. हे तुम्ही 5-6 प्रकारे करु शकतात, पाठ करणं हा त्यातलाच एक प्रकार आहे. आपल्या कोर्समध्ये जे 1897 शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने आत्मसात करणार आहात – ऐकून. ह्रा सर्व शब्दांचा उच्चार मी करुन दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही काही वेळा हे शब्द फक्त ऐकले, तरीही ते तुम्हाला समजतील व तुम्ही त्यांचा वापर सुद्धा करु शकाल.
उत्तर – हो, कारण ह्रा कोर्स मध्ये इंग्लिश बोलण्यासाठी ग्रामर मधल्या जेवढया टॉपिक्सची आवश्यक्ता आहे, फक्त तेवढेच टॉपिक्स घेतले आहेत व तेही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी कि तुम्हाला इंग्रजी ग्रामरपेक्षा मराठी व्याकरण आधी समजून घ्यावं लागणार आहे. कां ते तुमच्या लक्षात येईलच.
उत्तर – या प्रश्नाचं उत्तर बरंचसं तुमच्यावर अवलंबून आहे. ज्या स्टेप्स मी या कोर्स मध्ये सांगितल्या आहेत, त्या सर्व तुम्ही आत्मसात केल्या व त्यांचा वापर केला कि लगेच तुम्ही बोलू श्काल. ह्रा 4 स्टेप्स व्यवस्थित वापरण्यासाठी तुम्ही किती दिवस घ्याल ? साधारणपणे 100 दिवसांत तुम्ही व्यवस्थित बोलू शकाल. इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात तर तुमची 1 महिन्यातच होईल.